अखिल भारतीय मराठा जागृती मंच, गोवा, महिला मंच आणि मराठा सेवा संघ गोवा, राज्य शाखा महिला जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन कार्यक्रम मुरगाव येथील सडा किल्ला येथे आयोजित करण्यात आला होता .
यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या फोटोला पुष्पहार घालुन दीपप्रज्वलीत करून जिजाऊ वंदनेने मान्यवराच्या हस्ते सुरवात करण्यात आली .
यावेळी सौ रंजना भरत पाटील,सौ सरीता हर्डीकर,सौ मनिषा रामचंद्र पाटील,सौ निता कल्लाप्पा पाटील ,सौ विजयालक्ष्मी नागराज वाबळे ,सौ नंदिनी बळवंत पाटील,सौ श्रेया बालाजी गायकवाड,सौ श्रीमती ह पवार, सौ मागले ,सौ श्रीमती उ जाधव आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या .
या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या भाषणात जशा मा साहेब जिजाऊनी आपले बाळ शिवबास माता पिता गुरू यारूपात कलाकौशल्यपारंगत घडवून क्रृर अन्याविरूध्द लढून स्वराज्य निर्माण केले. अशा महान शक्तींचा आचार विचार आत्मसात आणा ,जगात होणारे महिलावरील अत्याचार , नाहीसे झाले पाहीजे. शिक्षणामधून आपला इतिहास नाहीसा होत चालला आहे. याकडे लोकप्रतिनिधीनी जातीने लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली .
यावेळी लहान मुलासाठी अनेक क्रीडा उपक्रम घेण्यात आले .तसेच विजेत्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.