शिनोळी येथील राजर्षी शाहू विद्यालयातील दहावी विद्यार्थांचा निरोप समारंभ मुख्याध्यापक बी.डी. तुडयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी दीपप्रज्वलन केले. गुरुदक्षिणा म्हणून सर्व शिक्षकांना पुष्प व लेखणी दहावी विद्यार्थांच्या कडून देण्यात आले . तर दहावी वर्गाकडून ऑफीस तिजोरी भेटवस्तू शाळेला देण्यात आली .
यावेळी आठवीची विद्यार्थिनी संजना रेडेकर , नववीची विद्यार्थीनी प्रियंका बुव्वा यांनी शुभेच्छा दिल्या तर दहावीची विद्यार्थीनी निकिता मेणसे हीने कृतज्ञता व्यक्त केले . वर्ग शिक्षक आर . एम. पाटील यांना लेखणी व कलमी आंबा गुरुदक्षिणा म्हणून दहावी वर्गाकडून देण्यात आला .
यावेळी वर्ग शिक्षक आर. एम . पाटील बोलताना म्हणाले , शिक्षकांनी ज्ञानार्जन करून विद्यार्थांच्या व्यक्तीमत्वाला पैलू पाठलेले आहेत. विद्यार्थी हा संस्कारक्षम असेल तरच आदर्श समाज उभा राहू शकतो . तसेच भरभरून शुभेच्छा देत आशिर्वाद दिला . एन .टी .भाटे व मुख्याध्यापक यांनी शुभेच्छा दिल्या .
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कडून विद्यार्थांना स्नेह वनभोजन देण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस . बी कदम यांनी केले तर आभार एस जे पाटील यांनी मानले .