बेळगाव
राज्यातील भाजप सरकार मराठा समाजावर अन्याय करत आहे .त्यामुळे आता भाजप सरकारच्या समोर मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी ठराविक मुदत देण्यात आली आहे .त्याचप्रमाणे या मुदतीच्या कालावधीत समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे . या संघटनेचे राज्याध्यक्ष शामसुंदर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत हा इशारा दिला . तसेच कर्नाटकात सत्तेवर असलेले भाजप सरकार हे मराठा समाजासाठी नुसत्या आश्वासनांची खैरात करत आहे .परंतु कोणत्याही सुविधा योग्यरितीने पुरविल्या जात नाहीत . त्याचप्रमाणे विविध मागण्यांसाठी सातत्याने आश्वासने देण्यात आलेली आहेत. मराठा समाजाला इतर मागासवर्गीय घटकांसाठीचे आरक्षण उपलब्ध करून द्यावे बेळगाव जिल्ह्यातून श्रीमंत पाटील यांना मंत्रिपद बहाल करावे त्याचप्रमाणे मराठा समाज प्राधिकरणासाठी निधी वाढवून द्यावा अशा प्रमुख मागण्यांसाठी आता आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटकातील मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या देखील खूप महत्त्वाचं आहे राज्यामध्ये साठ लाख मराठा समाज विखुरलेला आहे या समाजाच्या मागण्यांचा विचार भाजपने करावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी आमदार मनोहर कडोलकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.