श्री भगवान महावीर यांचा जन्म कल्याण महोत्सवानिमित्त हिंदवाडी येथील महावीर भवन मध्ये अध्यात्मिक हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या हास्य कवी संमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी काल अध्यात्मिक हास्य कवी संमेलनाच्या पूर्वसंध्येला कवी जगदीप जैन हर्षदर्दी (उदयपूर), डॉ कमलेश वसंत (तिजारा, राजस्थान) श्री ब्रिजराज ब्रिज (रतलाम) डॉ लोकेश (धार, मध्य प्रदेश) श्री नरेंद्र जैन (रुषभदेव, राजस्थान) श्री दिव्या कमलाध्वी, (पुणे) उपस्थित होते.
यावेळी श्री मनोज संचेती, श्री राजेंद्र जक्कन्नवर, श्री अभय अवलक्की यांना सामाजिक, धार्मिक, लोकोपयोगी कार्यात केलेल्या अद्भूत योगदानाबद्दल
समाज भूषण प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय जैन महासभेचे राजेंद्र जैन, बीजेपी ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.