सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने यावर्षी नाथ पै व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. दरवर्षी सार्वजनिक वाचनालयात अनेक दिग्गजांचे व्याख्यान आयोजन करण्यात येते मात्र covid-19 च्या प्रादुर्भावा मुळे यंदाची व्याख्यान माला पुढे ढकलण्यात आली होती आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने आता व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे या व्याख्यान मालेचे हे 47 वे वर्ष आहे आणि खालीलप्रमाणे वक्ते यात सहभागी होणार आहेत
रविवार 17 मार्च एप्रिल रोजी गोव्यातील लोककला स्वरूप आणि आविष्कार या विषयावर डॉ सतीश देशपांडेव्याख्यान देणार आहेत तर सोमवार 18 एप्रिल रोजी झी मराठी हास्य सम्राट सांगलीचे प्राध्यापक अजितकुमार कोष्टी यांचा हास्य कार्यक्रम होणार आहे. मंगळवार 19 एप्रिल रोजी ‘जीवन त्यांना कळले हो’ या विषयावर सातारा येथील माजी प्राचार्य यशवंत पाटणे हे व्याख्यान देणार आहेत त्या याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे