बेळगाव :
राज्य सरकारने नाईट कर्फ्यू मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून बैठकीतील ठळक मुद्दे नागरिकांना दिलासा देणारे ठरले आहेत.
31 जानेवारीपासून रात्रीचा कर्फ्यु रद्द करण्यात आला आहे. तसेच पब क्लब रेस्टॉरंट बार आणि हॉटेल ची टक्केवारी 50 टक्के आसन क्षमतेचे करण्याचे निर्देश दिल्या आहेत.
याचबरोबर खुल्या जागेत लग्नसमारंभासाठी तीनशे आणि कार्यालयाच्या ठिकाणी 200 व्यक्तींवर मर्यादा कायम ठेवली आहे. या सर्व अंमलबजावणीला 31 जानेवारीपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती महसूल मंत्री आर अशोक यांनी पत्रकारांना दिली आहे.
तसेच चित्रपटगृहांमध्ये 50% उपस्थितीची मुभा देण्यात आली असून सर्व आस्थापने पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत. याशिवाय स्विमिंग पूल जिम 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
जरी रात्रीचा कर्फ्यू रद्द करण्यात आला असला तरी यात्रा रॅली मोर्चे निदर्शने करण्यावर बंदी घातली आहे. महाराष्ट्र केरळ आणि गोवा राज्यातून येणाऱ्यांसाठी आरटीपिसीआर चाचणी सक्तीची केली आहे.