बेळगावचे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांची तत्काळ बेंगळुरू येथे बदली करण्यात आली असून सध्या धारवाडचे डीसी म्हणून कार्यरत असलेले नितेश पाटील (२०१२ बॅच) यांची बेळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी हिरेमठ यांची बदली ही कर्नाटकातील आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रमुख बदल्यांपैकी एक आहे.
हिरेमठ हे लोकमित्र अधिकारी म्हणून ओळखले जात होते .नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी लोकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असणारा आणि संकटात सापडलेल्या लोकांना तत्पर प्रतिसाद देणारे जनतेचे सेवक म्हणून नावलौकिक मिळवले आहेत