बेळगाव ग्रामीण मधील आंबेवाडी गावांमध्ये इस्कॉन बेळगाव च्या वतीने जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी नृसिंह जयंती निमित्त दुपारी 3 ते 5 यज्ञ 5 ते 7 नगर संकिर्तन 7 ते 8 नाट्य, नृत्य 8 ते 9 प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले त्यानंतर 9 ते 10 महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
सदर नृसिंह जयंती चा महोत्सव अलतगा रोड सावंत मळा आंबेवाडी येथे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन तर्फे पार पडला.याप्रसंगी नर्सिंह यज्ञाच्या पूजन प्रसंगी बेळगाव ग्रामीण बीजेपी ग्रामीण चे माजी अध्यक्ष विनय विलास कदम , यांच्यासह भाविक उपस्थित होते. त्यानंतर दिंडी पूजन गाव प्रदक्षिणा, आणि महाप्रसादाचे वितरण करून या नृसिंह जयंतीची सांगता करण्यात आली.