No menu items!
Saturday, August 30, 2025

युवा पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण

Must read

विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर, सांगली, पुणे, रत्नागिरी, बीड, नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र असे कार्यक्षेत्र असलेल्या युवा पत्रकार संघाच्या वतीने आपल्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार सोहळा रविवारी २९ मे रोजी कोल्हापुरातील नष्टे लॉन येथे संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सामाजिक, आदर्श शिक्षक, वैद्यकीय सेवा, कला, क्रीडा,सांस्कृतिक तसेच विशेष म्हणजे विविध प्रसार माध्यमातील पत्रकार, व छायाचित्रकार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नूतन आमदार जयश्री जाधव, सिनेअभिनेत्री पुजा जयस्वाल, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, नगरसेवक राहुल चव्हाण, नगरसेका उर्मिला बेलवलकर नगरसेवक अशोकराव भंडारे, नगरसेवक दिलीप पोवार , गोमटेश विद्यालयाचे व्हाईस चेअरमन प्रशांत उर्फ उदय पाटील एड, संदीप पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

प्रमुख पाहुण्या नूतन आमदार जयश्री जाधव या कोल्हापूर उत्तर च्या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्याने युवा पत्रकार संघाच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले.आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या'” पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. उज्वल भारत बनविण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्नशील रहावे” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच अण्णा व पत्रकार यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते अण्णांच्या सर्व अपेक्षा मतदार संघातील मी पूर्ण करणार असून पत्रकारांनी सहकार्य करावे पत्रकारांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले,

पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रास्ताविक करताना युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले “युवा पत्रकार संघाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत काम केलेले आहे. युवा पत्रकार संघाच्या या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना काळात प्रसारमाध्यमातील व्यक्तींची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यांच्या नोकरीची शाश्वती नव्हती. परंतु युवा पत्रकार संघाने त्यांना मदतीचा हात दिला आहे. इथून पुढे फक्त पत्रकारांच्या हितासाठी व कल्याणासाठी तसेच शासनाच्या विविध योजना युवा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. असे अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी सांगितले.

नगरसेवक दिलीप पवार यांनी बोलताना पत्रकारांच्या घराचा ही प्रश्न कित्येक वर्षे प्रलंबित आहे पुढील काही महिन्यात महानगरपालिकेचे निवडणूक आहे निवडणूक होताच पत्रकारांच्या घराचा प्रश्न आम्ही हाती घेऊ तोही मार्गी लावण्याचा मानस आहे.
अशोकराव भंडारे यांनी आपल्या मनोगतात तेरा वर्षांपूर्वी पत्रकार संघाचे रोपटे लावले होते आज वटवृक्ष झाले पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भविष्यात ही संघटना महाराष्ट्रात भूमिका बजावेल याचा मला विश्वास आहे महाराष्ट्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या युवा पत्रकार संघाला माझ्याकडून शुभेच्छा!
कार्यक्रमासाठी प्रदेश अध्यक्ष रतन हुलस्वार, राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी,प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव वळवडे,राज्य सरचिटणीस अजय शिंगे. राज्य महिला कार्याध्यक्ष अस्मिता जाधव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रत्नदीप चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष मार्था भोसले, सांगली जिल्हा अध्यक्ष प्रवीण मिरजकर, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख तुकाराम कदम, मिरज तालुका अध्यक्ष अभिजीत निर्मळे मिरज तालुका उपाध्यक्ष कौतुक नागवेकर, नाशिक जिल्हा अध्यक्ष स्वप्नील आहेर, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दयानंद निकम, बीड जिल्हा अध्यक्ष फिरोज अली सय्यद, यांच्यासह पत्रकार बांधव पदाधिकारी सभासद उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!