हिंद वाडी येथील हिंद सोशल क्लब येथे उद्या जायंट्स ग्रुप ऑफ प्राईड सहलीचा अधिकार ग्रहण समारंभ पार पडणार आहे यावेळी सदर कार्यक्रम हुबळी फेडरेशनच्या अध्यक्षा तारादेवी वाली मुंबई येथील सेंट्रल कमिटीचे सदस्य दिनकर अमीन डॉक्टर सोनाली सरनोबत राजू माळवदे आणि अनंत लाड यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
जायंट्स ग्रुप ऑफ प्राईड सहेलीच्या अध्यक्षपदी आरती शहा यांची निवड करण्यात आली आहे.तर उपाध्यक्षपदी स्नेहल शहा आणि रश्मी पाटील यांची निवड झाली आहे. तर सचिवपदी जिग्नेश शहा आणि खजिनदार मोनाली शहा यांची निवड करण्यात आली आहे तसेच उद्या त्यांना अधिकार प्रदान करण्यात येणार आहेत. त्यामुळे या अधिकार ग्रहण सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.