1986 मध्ये कन्नड सक्ती विरोधात आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना आज हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकासमोर सर्व सीमा बांधवांनी अभिवादन केले.
याप्रसंगी सीमा बांधवांनी हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण केली आणि हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी सीमा भागातून अनेक कार्यकर्ते हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकासमोर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात यावेळी हुतात्म्यांना स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.