काकती येथे हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन बेळगाव च्या वतीने आपत्कालीन परिस्थितीत नागरीकांची कशाप्रकारे मदत करावी याबद्दल प्रात्यक्षिक देण्यात आले.
दरवर्षी पडत असलेल्या संततधार पावसामुळे बेळगाव मध्ये महापूर येत आ.हे या महापुरात जनावरे नागरिक यासह अनेक प्राणी-पक्षी अडकत आहेत त्यामुळे त्यांना यातून कशाप्रकारे बाहेर काढावे याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
यावेळी स्वयंसेवक आणि इच्छुक व्यक्तींना या प्रात्यक्षिक शिबिरात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी त्यांना पाणी आग आणीबाणीच्या परिस्थितीत कशाप्रकारे मानव आणि प्राण्यांचा जीव वाचविण्याकरीता मदत करावी आणि त्यांना कशा प्रकारे या संकटातून बाहेर काढावे हे शिकविण्यात आले.
याप्रसंगी हेल्पलाईन एमर्जेंसी रेस्क्यू फाऊंडेशनचे बसवराज हिरेमठ बीजेपी ग्रामीण बेळगावचे विनय विलास कदम यांच्यासह हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्कयू फाऊंडेशनचे स्वयंसेवक उपस्थित होते.