सर्व राज्यातील नागरिकांना त्या त्या भाषेतील परिपत्रके मिळतात. मात्र बेळगाव मधील मराठी भाषिकांना मराठी कागदपत्रे अद्यापही मातृभाषेतून कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत याबद्दल वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले असल्याने आतातरी सीमाभागातील मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेतून सरकारी परिपत्रके देण्यात यावी.अशी मागणी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केली.
याबाबत मध्यवर्ती चे अध्यक्ष दीपक दळवी यांनी मराठी कागदपत्रांसाठी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.मात्र गेल्या अठरा वर्षांपासून कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तसेच आपल्या बाजूने निकाल लागला तरी ही परिस्थिती अद्यापही जैसे थे असल्याचे यावेळी सांगितले.
मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेत परिपत्रके मिळावेत तसेच प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी आणि मराठी भाषिकांना मातृभाषेत परिपत्रके द्यावीत अशी मागणी यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी निवेदन स्वीकारले.