किर्लोस्कर रोडवरील न्यूक्लियस मॉल ट्रेंड्स मध्ये काम करणारी तरुणी बेपत्ता झाली आहे. कोमल कल्लाप्पा बेळगावकर वय 23 असे तिचे नाव असून ती बी.के कंग्राळी येथील रहिवासी आहे.
कोमल ही एक जून रोजी कामावर जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र कामावर हजर न राहता इतरत्र कोठे तरी गेली होती याची कल्पना तिने आपल्या कामावर आणि घरच्यांना सुद्धा दिली नाही तसेच रात्री पुन्हा घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदविली आहे.
जर सदर फोटो मधील युवती कोणालाही आढळल्यास त्यांनी 083 12405 203 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन केले करण्यात आले आहे.