महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सध्या बारा तास काम करावे लागत आहे. विधान परिषदेसाठी निवडणुकीकरिता वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 13 जून रोजी मतदान होणार असल्याने महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. त्यामुळे सहाजिकच कर्मचारी वर्गाचा ताण वाढला आहे
सदर निवडणुकीकरिता शहरात 12 हजार मतदार आहेत. त्यामुळे या मतदारांची नावे ऑनलाइन दाखल करण्याची सूचना निवडणूक अधिकारी अमलान बिश्वास यांनी केली आहे.
त्यामुळे दिवस कमी असल्याने महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना रात्री बारापर्यंत काम करण्याची वेळ आली आहे. काल मतदार यादी निवडणूक अधिकार्यांच्या वतीने तपासण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दोन दिवस आधी रात्री बारा पर्यंत काम करावे लागले.
यावेळी महानगरपालिकेच्या सर्व विभागातील कर्मचारी प्रशासन विभागाचे सचिव पिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना रात्री 12 पर्यंत काम लावण्यात आले होते.