दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे गणवेश वितरण व इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संतोष मंडलिक तर प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ दीपक देसाई श्री पुंडलिक मल्हारी पाटील व प्रशांत पुंडलिक पाटील कल्लाप्पा इराप्पा देसुरकर हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून श्री ईश्वर पाटील सर लाभले तसेच शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री नारायण पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या स्वागत गीताने झाली. शाळेचे मुख्याध्यापक श्री पी आर पाटील यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या साठ विद्यार्थ्यांना श्री पुंडलिक मल्हारी पाटील व कल्लाप्पा इराप्पा देसुरकर यांनी दिलेल्या गणवेशाचे वितरण करण्यात आले.
यानंतर मागील वर्षी झालेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये शाळेमध्ये प्रथम आलेल्या दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.. त्यानंतर गणित विषयात शंभर पैकी 100 गुण मिळविलेल्या दोन विद्यार्थिनी सोमेश्वरी काटकर व सौभाग्या यळ्ळूर यांचा विशेष मानधन देऊन शाळेचे मुख्याध्यापक श्री पी आर पाटील यांनी गौरव केला याप्रसंगी डॉ श्री दीपक देसाई यानी मुलांना भावी आयुष्यात कशाप्रकारे यशाला गाठता येते व कशा प्रकारे यशस्वी होता येते याची वेगवेगळी उदाहरणे देऊन बहुमोल असे मार्गदर्शन केले
प्रमुख वक्ते श्री ईश्वर पाटील यांनी आलेल्या मान्यवरां ची वेगवेगळी उदाहरणे देऊन कशाप्रकारे यशाला गवसणी घालता येते हे सांगितले तसेच प्रशांत पुंडलिक पाटील व नारायण पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संतोष मंडलिक यांनी आपले विचार मांडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर ए परब यांनी केले तर आभार श्रीमती एल पी झंगरुचे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.