उदयपूर मध्ये घडलेल्या घटनेचा आज बेळगाव मध्ये तीव्र निषेध करण्यात आला. नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या त्या हिंदू टेलर व्यापाराची तिथल्या धर्मीयांनी निर्घृण हत्या केली. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ आज बेळगावातील विविध हिंदु संघटनांच्या वतीने चन्नम्मा सर्कल येथे धर्मियांच्या प्रतिकृतीचे दहन करत तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन केले.
राजस्थान मधील उदयपूर येथे टेलर हिंदू कन्हैयालाल याची तलवारीने गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यामुळे याच्या निषेधार्थ संपूर्ण देशात त्याचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत.
आज येथील चन्नम्मा सर्कल मध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी चन्नम्मा चौकात भररस्त्यात आंदोलन केले आणि कन्हैयालालच्या मारेकर्यांना फाशी ची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली.