ट्रकला ओव्हरटेक करत असताना एका महिला बाल बाल बचावविली आहे. येथील गणेशपुर रोड आज सकाळी ही घटना घडली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून या ठिकाणी होणारी दुर्घटना टळली असून सदर महिलेने ट्रकला कशाप्रकारे ओव्हरटेक केले आहे. याचे चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.
सध्या पावसाला सुरुवात असल्याने अनेक रस्ते निसड झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी गाडी धीम्यागतीने मारणे गरजेचे बनले आहे.महत्त्वाचे म्हणजे महिलांनी दुचाकी चालविताना योग्य ती खबरदारी घेऊन तसेच चारही बाजूने लक्ष देऊन दुचाकी हळुवारपणे चालविणे गरजेचे बनले आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच येथील सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील तमन्ना आर्केड जवळ एक शिक्षिका महिला अशाच प्रकारे टँकरच्या बाजूने जात असताना तोल जाऊन ती टँकरच्या खाली सापडली यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आता गणेशपुर मध्ये अशी दुर्घटना घटनापूर्वीच चालकाने वेळीच ब्रेक लावल्याने सदर महिला या अपघातातून बाल बाल बचावली.