गुरु शिष्य ही परंपरा चालत आलेली गुरुवंदनी ज्ञानप्राप्ती होते. याची प्रचिती पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या हिंदीच्या प्राध्यापिका श्रीमती गीता कुलकर्णी यांच्या सेवानिवृत्ती समारंभात आली असे गौरवोद्गार समाजसेविका श्रीमती शोभा लोकुर यांनी काढले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका सारिका पाटील उपस्थित होत्या.प्रारंभी इशस्तवन आणि स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर विद्यालयाच्या प्राचार्या ममता पवार यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून स्वागत केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला .त्यानंतर महाविद्यालयाचे विद्यार्थी श्रेयस कुंडेकर आणि भूषण नावगेकर यांनी गीता कुलकर्णी यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली.
माजी विद्यार्थी उदय पाटील यांनी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे गीता कुलकर्णी यांचा सत्कार केला त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गीता कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राध्यापक वाय टी मुचंडी प्राध्यापक एसटी जनगौडा यांनी गीता कुलकर्णी यांच्या सेवा कार्याचे कौतुक केले.
नगरसेविका सारिका पाटील यांनी शिक्षक आणि शिक्षणाचे महत्त्व जीवनात किती महत्त्वाचे आहे हे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक प्रकाश नंदीहळ्ळी यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना गीता कुलकर्णी यांच्या कार्याचा आढावा घेत अनेक आठवणींना उजाळा दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रेणुका चलवेटकर यांनी केले प्राध्यापक सुरज यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले.