No menu items!
Monday, January 12, 2026

डॉक्टर्स दिनानिमीत्त मान्यवर डॉक्टरांचा सन्मान

Must read

तारांगण आणि डॉ.गिजरे जननी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने काही मान्यवर डॉक्टरांचा सन्मान आणि डॉ.शर्मिष्ठा देशपांडे यांचे विद्यार्थिनीसाठी करियर गाईडन्सवर व्याख्यान अशा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन महिला विद्यालय मराठी माध्यम विद्यालय येथे करण्यात आले होते. निमित्त होते डॉक्टर दिनाचे

आपल्या वैद्यकीय क्षेत्रात समाजासाठी आणि रुग्णांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल डॉक्टरदिना निमित्त काही मान्यवर डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.यासाठी वेगवगळ्या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर उपस्थीत होते.
एस .आर. राजस्थान आयुर्वेदा युनिव्हर्सिटी जोधपुर मधून पी.एच.डी केलेले व सध्या के.एल.ई .बी .एम. कंक णवाडी आयुर्वेदीक महाविद्यालयमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. महांतेश रामण्णावर यांचा सन्मान डॉ.दत्तप्रसाद गिजरे यांनी केला.

चंदगड तालुका माणगाव येथील नारायण क्लिनिक व प्रसूती हॉस्पिटलचे डॉ. विलास पाटील यांचा सन्मान शाळेचे उपमुख्याध्यापक के.एन.पाटील यांनी केला.डॉ.विलास पाटील यांनी आपल्या कौशल्याने जवळ जवळ ७००० सामान्य प्रसूती केल्या आहेत. कित्येक सर्पदंश रुग्णही बरे केले आहेत.तसेच त्यांनी २००६ साली ५वी ते १२ वीसाठी आंबोली पब्लिक स्कूल’ ही ‘शिक्षण संस्था सुरू केली.
एमडी पीएचडी व संशोधन केलेल्या व सध्या भरतेश होमिओपॅथी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये प्राध्यापक गाईड म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. शैला उडचणकर यांचा सन्मान डॉ.प्रविण देशपांडे यांनी केला.
दुर्गम भागातील मुलांसाठी एका एनजीओ सोबत कार्यरत असणाऱ्या मुलांची शारीरिक, मानसिक क्षमता सुदृढ बनवण्यासाठी करियर गाईडन्स शिबिरातील मार्गदर्शक डॉ. शर्मिष्ठा देशपांडे यांचा सन्मान अरुणा गोजेपाटील यांनी केला.डॉ.शर्मिष्ठा देशपांडे यांनी शाळेच्या दहावीच्या विद्यार्थीनींसाठी अगदी सोप्या पद्धतीने सुंदर करियर मार्गदर्शन केले.स्वत:ला आवड असलेलच क्षेत्र निवडून,स्वत:ची जिद्द व मानसिकता तपासून क्षेत्र निवडले तरच उत्तम करियर होऊ शकते असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले.यासाठी दहावी नंतर कुठले क्षेत्र निवडावे या विचाराने गोंधळ उडू नये म्हणुन नेमका कल कशात आहे हे तपासून पाहण्यासाठी Aptitude test ही तपासणी करुन घ्यावी असेही त्यांनी सुचवले.

या कार्यक्रमाचे आयोजक गिजरे हॉस्पिटलचे डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे उपस्थितीत होते.त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन जननी ट्रस्ट व तारांगण संस्थेने केले होते.तारांगण च्या ईतर सदस्या,शाळेच्या दहावीच्या विद्यार्थिनी,शिक्षववृंद आदी कार्यक्रमास उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन रोशनी हुंदरे,व आभार प्रदर्शन अस्मिता आळतेकर यांनी केले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!