रोटरी क्लब ऑफ सेंट्रल तर्फे डॉक्टर व सी ए दिनानिमित्त मान्यवर डॉक्टरांचा व सीए यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल तर्फे डॉक्टर नागभूषण चौगुले व सीए विक्रम कोकणे भरतेश पाटील व इतर मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी डॉक्टर्स आणि सीए नी सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल तर्फे सर्वांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर आणि सी ए यांचा परिचय करून देण्यात आला.
त्यानंतर डॉक्टर समाजात करत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. त्यानंतर सीए यांच्या प्रतीही कृतज्ञ त्या व्यक्त करण्यात आली. यावेळी या मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष रवी हत्तरकी यांनी केले तसेच या कार्यक्रमास सेक्रेटरी अमित पाटील, राजेंद्र देसाई यांच्यासह क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते .



