देशात आणि जागतिक स्तरावर रोटेरियन्स मधील व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टिकोनातून रोटरी च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सदर कार्यक्रम हॉटेल नेटिव्ह मध्ये पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्यातील रेटोरीयन सतीश राजमाने उपस्थित होते. यावेळी त्यांनी कशाप्रकारे व्यवसाय वृद्धीस नेला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर यावेळी रोटरियन अजय हेड्डा यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली .तसेच रोटेरियन अभिजित शहा यांना सचिव पद देण्यात आले.
रोटरी तर्फे आयोजित करण्यात आलेले बिजनेस फेलोशिपचे यंदाचे पहिले वर्ष असून या पहिल्या वर्षात अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार समन्वयक यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच येथील बिजनेस फेलोशिपच्या खजिनदारपदी कीर्ती सुरांगण काम पाहणार असून समन्वयक म्हणून रोटेरियन सौम्या ,संगीता ठाकूर आणि सूर्या कुलकर्णी हे काम पाहणार आहेत.