व्हाय नॉट क्रिएशन यांनी आपल्या यूट्यूब चॅनेल वर माहेश्वरी अंधशाळेच्या मुलांवरती आधारित लघुपट प्रसारित केलेला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या दृष्टी हा लघुपट आता सर्वांना फक्त एका क्लिकवर यूट्यूब चॅनेल वरती पाहता येणार आहे.
अंध मुलांचा जीवन प्रवास सक्षम करण्याचा प्रयत्न या लघुपटद्वारे दाखविण्याचा प्रयत्न प्रणाम राणे आणि अक्षय गोडसे यांनी केला आहे. याआधी या दृष्टी लघुपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर नागरिकांमध्ये हा लघुपट पाहण्याकरिता उत्सुकता लागली होती.
त्यामुळे व्हाय नॉट क्रिएशनने आपल्या युट्युब चॅनेल वरती दृष्टी हा लघुपट प्रसारित केला आहे. तसेच त्यांनी अंध मुलांवरती सदर डॉक्युमेंटरी फिल्म उत्कृष्टरित्या बनवल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
खालील लिंक क्लिक करून आपण दृष्टी हा लघुपट एका क्लिकवर पाहू शकता https://youtu.be/Kz-2-Qx34yU