इनरव्हील क्लब पदाधिकाऱ्यांचा दिनांक नऊ जुलै रोजी अधिकार ग्रहण समारंभ पार पडणार आहे. यंदा इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या नूतन अध्यक्ष म्हणून शालिनी चौगुले व सचिव म्हणून पुष्पांजली मुकांनावर यांची निवड करण्यात आली आहे.
रूपा देशपांडे यांच्या हस्ते या दोघांनाही अधिकार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच हा कार्यक्रम 9 जुलै रोजी सायंकाळी चार वाजता आएमईआर सभागृहात पार पडणार असून या समारंभात अध्यात्मिक मार्गदर्शन उषा हेगडे करणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अन्य पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ देखील पार पडणार आहे.



