चंदगड तालुक्यातील शिवनगे गावचे प्रतिष्ठित नागरिक व प्रगतशील शेतकरी माजी आमदार कै. नरसिंगराव भुजंगराव पाटील यांचे कनिष्ठ बंधू आणि बेळगावचे प्रसिद्ध व्यापारी सुधीर पाटील यांचे वडील दत्तात्रय भुजंगराव पाटील यांचे काल बुधवारी रात्री निधन झाले.
शतायुषी अण्णांच म्हणजे दत्तात्रय पाटील यांच व्यक्तीमत्व चंदगड बेळगांवसह संपुर्ण महाराष्ट्रात परीचीत होतं. कांहीं महिन्यांपूर्वी अण्णांचा शतायुषी वाढदिवस गावकऱ्यांनी व चंदगडवासियानी मोठ्या थाटात साजरा केला होता. कै. आमदार नरसिंगराव पाटील यांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीत त्यांच्या सर्व भावंडांची साथ असायची. ज्यावेळी आमदार साहेबांना भेटण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासुन ते अनेक अनेक सर्वपक्षीय नेतेमंडळी पर्यंत जी मान्यवर मंडळी गावी यायचे त्या सर्वांचे अण्णांशीही तितकेच स्नेहाचे संबंध होते.
अत्यंत साधे राहणीमान, शांत संयमी स्वभाव व सर्वांशी आपलेपणा हे अण्णांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते. नेहमी शेती व्यवसायात आधुनिकता कशी आणावी, शेतीत नवनवीन प्रयोग कसे राबवायचे, उत्तम शेती कशी होईल यावर नेहमी अण्णांच् लक्ष असायचं. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक कार्यात सढळ हस्ते मदत करणारे दत्तात्रय भुजंगराव पाटील आज आपल्यातुन निघुन गेले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व पाटील परिवाराचा दुःखभार हलका होवो, अशा शब्दात बेळगावचे प्रसिद्ध व्यापारी माणिक होणगेकर यांच्यासह समस्त व्यापारी बंधुं व मर्चंट असोशीएशनवतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. अंत्यविधी आज गुरुवारी सकाळी 11 वाजता शिवणगे येथे होणार आहे.



