खडक गल्लीत उद्या चिकनगुनिया डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खडक गल्ली येथील श्री वेताळेश्वर सांस्कृतिक भवन येथे भरतेश हायस्कूल व मेडिकल कॉलेज यांच्यातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
उद्या मंगळवार दिनांक 12 जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत खडक गल्ली मध्ये चिकनगुनिया व डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे तरी परिसरातील नागरिकांनी आपल्या आधार कार्डच्या झेरॉक्स प्रत सह या ठिकाणी उपस्थित राहून लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.