गेल्या चार दिवसांपूर्वी बेळगाव यलो अलर्ट मध्ये होता तर आता बेळगाव मध्ये पडत असलेल्या पावसाचा जोर पाहता बेळगावला ऑरेंज झोन जाहीर करण्यात आला आहे.
बेळगाव सह हावेरी धारवाड गुलबर्गा आणि बिदर हे पाच जिल्हे सध्या ऑरेंज झोन मध्ये आहेत तर विजयपूर बागलकोट शिमोगा दावणगिरी यादगिर म्हैसूर या सहा जिल्ह्यांना यल्लो अलर्ट असून तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला होता मात्र आता पावसाचा जोर पाहता बेळगावला ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे तसेच असाच पाऊस पडत राहिल्यास बेळगाव रेड अलर्ट मध्ये येण्याची शक्यता आहे.