यंदा पाऊस असल्याने महिला विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शाळेतच आषाढ एकादशी साजरी केली. यावेळी विद्यार्थिनी पांढरा सदरा कपारावर टिळा आणि गळ्यात माळ घालून शाळेत आषाढी एकादशी निमित्त उपस्थित असलेल्या पाहायला मिळाल्या.
यंदा रविवारी आषाढ एकादशी असल्याने शाळेला सुट्टी होती. त्यामुळे महिला विद्यालयात शाळेत आज सोमवारी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.
यावेळी विठ्ठलाची पूजा करून आरती म्हणण्यात आली त्यानंतर विद्यार्थिनींना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
शाळेमध्ये आषाढ एकादशी आणि कार्तिक एकादशी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात येते. यावेळी मुली दिंडी घेऊन शाळेपासून खडेबाजार येथील विठ्ठल मंदिरापर्यंत जातात आणि त्या ठिकाणी पूजा करतात मात्र यंदा पाऊस असल्याने विद्यार्थिनींनी शाळेच्या बाहेर न पडताच शाळेच्या सभागृहातच आषाढ एकादशी उत्साहात साजरी केली.