प्रगतिशील लेखक संघाच्या गेल्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत आषाढी एकादशीनिमित्त संतसाहित्य व चळवळ या विषयांवर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे होते.
मेणसे यांनी तुकाराम यांच्या पासून ते तुकडोजी महाराज यांच्या पर्यंतच्या भारतातील संत परंपरेची माहिती दिली. सर्वच संतानी अंधश्रद्धा अनिष्ट रुढी बुवाबाजी यावर आपल्या भजन किर्तनातून कठोर प्रहार करून समाजप्रबोधनाचे कार्य केले असे सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत अँड. नागेश सातेरी कृष्णा शहापूरकर सागर मरगाण्णाचे अर्जुन सागावकर शिवलिला मिसाळे आदिनी भाग घेतला. बैठकीस प्रा.दत्ता नाडगौडा अँड अजय सातेरी संदीप मुतगेकर महेश राऊत किर्तीकुमार दोसी आदि सदस्य उपस्थित होते.