गेल्या दोन दिवसापूर्वी मुसळधार पावसाने चंचवाड गाव येथील एका घराची भिंत बालकावर कोसळल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला. त्यामुळे या बालकाच्या कुटुंबीयांना मदत करण्याकरिता खानापूर भाजप नेते ए दिलीप कुमार धावून आले आहेत.
त्यांनी या घटनेत मृत पावलेल्या अनंतू धर्मू पाशेट्टी या बालकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन मदतीचा हात दिला आहे.तसेच पाशेट्टी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.
खानापूर तालुक्यातील चंचवाड गावातील पंधरा वर्षाच्या मुलाचा गुरुवारी जनावरांना वैरण घालत असताना अंगावर भिंत पडल्याने मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनी या कुटुंबीयांना कोणतीही मदत हवी असल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असून त्यांना 25 हजार रुपयांची मदत देखील देऊ केली आहे.
याप्रसंगी खानापूर भाजप नेते ए दिलीप कुमार ,भाग्यश्री हणबर, मारुती हुराकडली, पुंडलिक गिड्डाप्पागोळ, रामन मुरासिद्धा नागराज मिथुन फकीराप्पा संगाप्पा यांच्यासह अन्य उपस्थित होते.