आज मंगळवार दि.19/07/2022 रोजी हेड पोस्ट ऑफिस बेळगाव ता. जि.बेळगाव येथे हनुमान मंदिर परिसरातील भग्न झालेल्या ,विटंबना झालेल्या, फुटलेल्या,तुटलेल्या, खराब झालेल्या प्रतिमांचे संकलन सर्व लोक सेवा फौंडेशन बेळगाव चे अध्यक्ष श्री. विरेश बसय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
हेड पोस्ट ऑफिस चे मुख्य अधिकारी यांच्या विनंतीवरून पोस्ट ऑफिस परिसर व हनुमान मंदिर परिसरातील भग्न प्रतिमा पोस्ट कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत जमा करण्यात आल्या.
पोस्ट ऑफिस चे सन्माननीय अधिकारी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले तसेच आपण व आपला कर्मचारी वर्ग या सामाजिक उपक्रमास भविष्यात सहकार्य करू असे आश्वासन ही दिले, जमा झालेल्या प्रतिमांचे विधिवत संस्करण करण्यात येतील असे अध्यक्ष श्री. विरेश बसय्या हिरेमठ यांनी सांगितले .
तसेच यापुढेही अशा भग्न झालेल्या प्रतिमा असतील तर परिसरातील नागरिकांनी सर्व लोक सेवा फौंडेशनशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले ,यावेळी सोबत श्री.सी.एम.केरीमठ, श्री.मंजुनाथ अंगडी,श्री.बाळू कणबरकर, तसेच पोस्ट ऑफिस चे कर्मचारी उपस्थित होते.



