बेळगाव : प्रतिनिधी कडोली येथे मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या संततधार पावसाने कडोली येथील कलमेश्वर गल्लीतील रहिवासी महादेव गणपती फडके यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले. यामध्ये फडके यांचे स्वच्छतागृह, गोबरगॅस यांचे नुकसान झाले आहे. यामुळे आर्थिक फटका बसला आहे. घराजवळ असणारे झाड उन्मळून पडले. यामध्ये फडके यांचे नुकसान झाले. याबाबतची अधिक माहिती ग्रा. पं. कार्यालयात देण्यात आली असून ग्रा. पं. उपाध्यक्षा प्रेमा नरोटी, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, तलाठी आरिफ मुल्ला, पीडीओ वासुदेव एक्रंद आदींसह ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते. त्यांनी नुकसानीचा पंचनामा केला. सरकारकडून अधिकाधिक भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले
घरावर झाड कोसळल्याने नुकसान
By Akshata Naik

Must read
Previous articleबी आर गड्डेकर यांची बदली
Next articleदेवतांच्या भग्न प्रतिमा झाल्या संकलित