पोलीस निरीक्षक बी आर गडेकर यांची बदली करण्याचा आदेश राज्य सरकारने बजाविला आहे. त्यामुळे ते आता हेस्कॉम जागृत दलाचे पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत
याआधी बी आर गड्डेकर हे सी एन अर्थात बेळगावचे सायबर आर्थिक गुन्हेगारी पोलीस ठाणकाचे पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत होते. आता त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक संजीव कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
बी आर गड्डेकर यांनी अनेक सायबर फसवणुकीचे प्रकरण हाताळले असून काहींना यामध्ये अटक देखील केली आहे . आता बी आर गड्डेकर यांच्यासह राज्यातील 92 पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे.