भरधाव मोटारसायकलची मोरीच्या कठड्याला धडक बसल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार झाला. सदर अपघात खानापूर तालुक्यातील जांबोटी–हब्बनहट्टी रस्त्यावर काल सायंकाळी घडला .
मारुती व्हन्नाप्पा पट्टेकर वय 55 राहणार जांबोटी जनता कॉलनी असे अपघात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे .त्याची मोटरसायकल मोरीच्या कठड्याला धडकल्याने झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे .
मारुती हे हब्बनहट्टी येथील आपल्या शेताकडे जात असताना त्यांच्या स्प्लेंडर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मोरीच्या कठड्याला जोरदार धडक बसली. त्यात तोंडाला व डोक्याला जोराचा मार बसल्याने ते जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.उत्तरीय तपासणीनंतर मारुती यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.