बेंगलोर – कर्नाटक राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या 60 लाखांपर्यंत आहे.हा समाज आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे.याचा विचार करून केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करावेत.यासाठी कर्नाटक राज्य मराठा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसह दिल्लीतील जेष्ठ मंत्र्यांच्या भेटी घेण्यात येत आहेत.अशी माहिती कर्नाटक मराठा समाज फेडरेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांनी दिली आहे.
काल मंगळवारी बेंगळूर येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मा ई व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कर्नाटक राज्य मराठा विकास प्राधिकरणाच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यभरातून तब्बल वीस हजारहून अधिक मराठा समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर, कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत.राज्यातील 60 लाख मराठा समाजाच्या हितासाठी केंद्र सरकारने विशेष उपाययोजना हाती घ्याव्यात. कर्नाटक राज्यात मराठा समाजाचे 2 ए मध्ये समावेश करावा. अशी प्रमुख मागणी केंद्र सरकारकडे केली जाणार आहे.
मराठा समाजातील युवा पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी केंद्र सरकारने शिष्यवृत्ती जाहीर कराव्यात. महिलांना स्वावलंबी बनावे यासाठी विशेष रोजगार उपलब्ध करून द्यावेत.युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. अशी ही मागणी केंद्रीय मंत्र्यांकडे करण्यात येणार आहे.असेही श्यामसुंदर गायकवाड यांनी सांगितले आहे.
दरम्यान अध्यक्ष शामसुंदर गायकवाड, उपाध्यक्ष-माजी आम.मनोहर कडोलकर, बेळगाव जिल्हा अध्यक्ष वैभव कदम यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकातील पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला रवाना झाले आहेत.



