बीडी (ता. खानापूर) येथील एन. एम. कॅम्पस पीयूसी कॉलेज आणि शाळेमध्ये आयोजित इयत्ता आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत आणि सत्कार समारंभ आज बुधवारी उत्साहात पार पडला.
शाळेच्या सभागृहामध्ये संस्थेचे चेअरमन एम. एम. बिडीकर यांच्या अध्यक्षतेखाली या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या भाजप नेत्या व नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ सोनाली सरनोबत, संस्थेचे सेक्रेटरी गणू कुलकर्णी, संचालक राजेंद्र तिमोळी, डॉ बापशेट, एम. एम. दफेदार,दत्ताराम पाटील यांच्यासह प्राचार्य एल. पी. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी प्राचार्य पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. समारंभात शाळेतील इयत्ता आठवी, नववी, दहावी तसेच पीयूसी प्रथम व द्वितीय वर्षात दाखल झालेल्या विद्यार्थी -विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ सोनाली सरनोबत यांनी मुलांना शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचे महत्व पटवून दिले. त्याचप्रमाणे आपल्या नियती फाउंडेशनतर्फे महिला सक्षमीकरण आणि युवा पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. व्यासपीठावरील अन्य मान्यवरांनी देखील यावेळी समयोचित विचार व्यक्त केले.
यावेळी एसएसएलसी परीक्षेत गुणवत्तेत उत्तीर्ण झालेल्या संजना कटगार (96%), रेश्मा मकानदार (91%), मेघा होसट्टी (88%) तसेच पियूसी परीक्षेत गुणवत्तेत उत्तीर्ण झालेल्या लीलावती चौगड्डी (89%), मंगल देमीनकोप्प (88%), देमक्का बबदार (81%) टक्के आणि सिद्धाप्पा वाटण्णावर (79%) यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समारंभास बसवराज कडेमणी, बाळेश चव्वन्नावर, ज्योतिबा भेंडीगिरी, नागेश रामजी आदींसह एन. एम. कॅम्पस पीयूसी कॉलेज आणि शाळेचा शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.



