पत्रकार विकास अकादमीच्या वतीने सोमवारी लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त टिळकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अकादमीचे सदस्य पत्रकार उपस्थित होते. अकादमीचे अध्यक्ष प्रसाद प्रभू यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करून पत्रकारितेच्या क्षेत्रात तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात अपूर्व असे योगदान दिलेल्या लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी पत्रकार डि के पाटील यांनी प्रास्ताविक केले. पत्रकारांनी आदर्श म्हणावीत अशी व्यक्तिमत्व फार थोडकी आहेत. यामध्ये लोकमान्य टिळकांचे नाव हे अग्रक्रमाने घेता येईल असे विचार पत्रकार विकास अकादमीचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांनी काढले. याप्रसंगी पत्रकार रवी नाईक, गुंडू गोंडवाडकर, कामत व इतर पत्रकार उपस्थित होते.
पत्रकार अकादमीतर्फे टिळकांना अभिवादन
By Akshata Naik

Previous articleश्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)
Next article‘हिंदू आपल्याच देशात असुरक्षित ?’