No menu items!
Monday, January 12, 2026

‘हिंदू आपल्याच देशात असुरक्षित ?’

Must read

गळे कापणार्‍या जिहाद्यांपासून स्वत:ला आणि कुटुंबाला वाचायचे असेल, तर हिंदूंनी आत्मरक्षणासाठी सज्ज व्हावे लागेल ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा

नुपूर शर्माचे समर्थन केले म्हणून राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये हिंदूविरोधी शक्तींकडून हिंदूंच्या गळे कापून हत्या केल्या जात आहेत. हिंदू आणि देशविरोधी जिहादी शक्ती यांच्यात युद्धाला आरंभ झालेला आहे. युद्धाचा बिगुल वाजलेला आहे. हिंदू जर ‘सेक्युलर’ राहिला, तर तो आणि त्याचा परिवार वाचणार नाही. सरकार आणि पोलीस आपल्याला वाचवतील, या भरवश्यावर हिंदूंनी राहू नये. हिंदूंनी आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण घेतले, तरच ते वाचतील. हिंदूंना स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबाला वाचवायचे असेल, तर प्रत्येक हिंदूंनी आत्मरक्षणासाठी सज्ज व्हावे लागेल, असे आवाहन *प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि तेलंगाणा येथील भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह* यांनी केले आहे. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित *‘हिंदू आपल्याच देशात असुरक्षित ?’* या ऑनलाईन विशेष परिसंवादात बोलत होते.

या वेळी *‘श्रीराम सेने’चे कर्नाटक राज्याचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधर कुलकर्णी* म्हणाले की, कर्नाटक राज्यामध्ये प्रवीण नेट्टारू यांच्या आधी फेब्रुवारी महिन्यात हर्ष याची हत्या झाली होती. याची मूळ सुरूवात कर्नाटकातील भटकल येथून वर्ष 1993 ला झाली आहे. त्या वेळी आमदार चित्तरंजन यांची हत्या झाल्यावर दंगल होऊन नऊ महिने संचारबंदी लागली होती. तेव्हापासून कर्नाटकात सातत्याने हिंदूंच्या हत्या होत आहेत. गेल्या पाच महिन्यांत 36 हून अधिक हिंदूंच्या हत्या कर्नाटकात झालेल्या आहेत. या विरोधात सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र आल्या नाहीत, तर कर्नाटकात हिंदूंना बाहेर फिरणेही कठीण होईल.

*कर्नाटकातील चित्रपट वितरक आणि उद्योगपती श्री. प्रशांत संबरगी* म्हणाले की, प्रवीण नेट्टारू याने त्याच्या मांसाच्या दुकानात काम करणार्‍या एका मुसलमानाला 3 मासापूर्वी काढले होते. ‘हलाल मांस’ बंद करून हिंदू पद्धतीचे ‘झटका मांस’ विकणे चालू केले. त्यामुळे त्याची हत्या झालेली आहे. हिंदूंच्या हत्या करून आम्ही किती शक्तीशाली आहोत, हे दाखवण्याचा ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा (PFI) प्रयत्न आहे. पी.एफ्.आय. ही भारतातील ‘अल् कायदा’ आहे. तिच्यावर तात्काळ कारवाई नाही केली, तर पुढे जाऊन हा आणखीन मोठा राक्षस होऊ शकतो.

*हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा* म्हणाले की, कर्नाटकात मागे 23 हिंदूंच्या हत्यापैकी 10 हत्यांमध्ये पी.एफ्.आय. आणि सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) यांचा सहभाग असल्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले होते. काँग्रेसचे नेते सिद्धरमैय्या यांनीही या संघटनांवर बंदीची मागणी केली होती.  भाजपच्या वर्ष 2018 च्या निवडणूक जाहिरनाम्यामध्येही सरकार आल्यास पी.एफ्.आय. आणि कर्नाटका फोरम फॉर डिग्नीटी (KFD) या संघटनांवर बंदी आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते; त्यानुसार कर्नाटक सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करून या धर्मांध संघटनांवर कारवाई केली पाहिजे.

आपला नम्र,
श्री. रमेश शिंदे,
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.
(संपर्क : 99879 66666)

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!