येथील एअरपोर्ट रोड व परिसरातील ,वडाच्या झाडाखाली टाकलेल्या , भग्न झालेल्या ,विटंबना झालेल्या, फुटलेल्या,तुटलेल्या, खराब झालेल्या प्रतिमांचे संकलन सर्व लोक सेवा फौंडेशन बेळगाव चे अध्यक्ष श्री. विरेश बसय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली जमा करण्यात आल्या. एअरपोर्ट परिसरातील नागरिकांनी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले .
तसेच श्री.निळकंठय्या शास्त्रीजी यांनी हिंदू धर्माप्रति श्री .विरेश बसय्या हिरेमठ यांचे सुरू असलेले हे कार्य खूपच प्रेरणादायक व समाजासाठी आशादायक आहे ,देव त्यांना खास या कामासाठी शक्ती देवो असा आशीर्वाद दिला, तसेच या सामाजिक उपक्रमास सामाजिक कार्यकर्ते श्री.धनंजय जाधव यांनीही समाजाप्रती सुरू असलेले उत्कृष्ट काम म्हणून गौरव केला व भविष्यात आपण व सर्व सुज्ञ नागरिक या उपक्रमास सहकार्य करू असे आश्वासन ही दिले.
जमा झालेल्या प्रतिमांचे विधिवत संस्करण करण्यात येतील असे अध्यक्ष श्री. विरेश बसय्या हिरेमठ यांनी सांगितले .तसेच यापुढेही अशा भग्न झालेल्या प्रतिमा असतील तर परिसरातील नागरिकांनी सर्व लोक सेवा फौंडेशनशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले .
यावेळी सोबत श्री.निळकंठय्या शास्त्रीजी, राचाय्या हिरेमठ, सामाजिक कार्यकर्ते श्री.धनंजय जाधव, श्री.संतोष देशनूर,, श्री.रविकिरण हेग्गेरी,श्री.गंगय्या हिरेमठ श्री.बाळाराम कणबरकर, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.



