पुन्हा एकदा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना कोविडची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर घरात आरटी नगर येथील त्यांच्या निवासस्थानी उपचार करण्यात येत आहेत. अशी माहिती त्यांनी ट्विटर द्वारे कळविली आहे.
याआधीही मुख्यमंत्र्यांना जानेवारी महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.यावेळी त्यांनी स्वतःला आयसोलेशन मध्ये ठेवले होते.मात्र आता त्यांच्यात पुन्हा कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असल्याने ते घरात उपचार घेत आहेत.
तसेच त्यांची माजी मुख्यमंत्री बीएस येडूरप्पा त्यांनी देखील त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.याबरोबरच मंत्री डॉक्टर अश्वत्थनारायण हल्लाप्पा आचार प्रभू चव्हाण बीसी नागेश यांनी देखील फोनवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत.