येथील लायन्स क्लब बेळगाव शहापूर या क्लबचा ३३ वा अधिकार ग्रहण सोहळा आज शनिवार ६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ७. ३५ वाजता हॉटेल नेटिव्ह तिसरे रेल्वे गेट बेळगाव या ठिकाणी होणार आहे.
यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून अमर य अकणोजी हे अधिकार ग्रहण करणार आहेत. तर सेक्रेटरी म्हणून राजेश देसुरकर व खजिनदार म्हणून महादेव हिरोबा हे अधिकार ग्रहण करणार आहेत. यांना लायन्स क्लबचे माजी गव्हर्नर श्रीकांत शानभाग हे पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत. याप्रसंगी लायन्स क्लबचे इतर संचालक, सल्लागार व सदस्य उपस्थित राहणार आहे.