जन्माष्टमीनिमित्त आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरासमोर मंडपाची मुहूर्तमेढ करण्यात आली आहे .
इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते यावेळी पूजा करण्यात आली. प्रारंभी कीर्तन, भजन व त्यानंतर महाराजांचे प्रवचन झाले. याप्रसंगी बाळकृष्ण भट्टड, राम प्रभू, संकर्षण दास, नंदनंदन प्रभू, गौरांग प्रसाद, नागेंद्र प्रभू व इतर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच दिनांक १८, १९ व २० ऑगस्ट हे तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.असे इस्कॉन तर्फे कळविण्यात आले आहे