शुक्रवारपासून गोल्फ कोर्स मैदानात लपून बसलेल्या बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरा झाला असून त्याला पकडण्याकरिता वनविभागाने कंबर कसली आहे. तसेच या बिबट्याच्या हालचाली ठिकाणी बसवलेल्या कॅमेरात आढळून आल्याचे देखील डीएफओ अँथोनी यांनी आज प्रसार माध्यमांना सांगितले.
सदर बिबट्या गेल्या पाच दिवसांपासून येथील गोल्फ कोर्स मैदानातच ठाण मांडून बसला आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
या कामाकरिता वनविभागाचे 50 कर्मचारी त्याच्या शोध कार्यात गुंतले असून त्याला पकडण्याकरिता अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत मात्र यामध्ये हा बिबट्या अडकत नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे
तसेच डीएफओ एचएस अँथोनी यांनी या भागातील नागरिकांनी सतर्क राहून वन विभागाच्या कारवाईला सहकार्य करावे असे आवाहन देखील केले आहे.
सध्या वनविभागाचे कर्मचारी बिबट्याच्या शोधासाठी शोधमोहीम सुरूच ठेवले आहेत तसेच त्याला लवकर जेरबंद करावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.