निधी कणबरकर हिने राणी चन्नमा विश्वविद्यालयात प्रथम क्रमांकासह गोड मेडल पटकाविले आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
तिने 2400 गुना पैकी 1942 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे .तसेच तिला गोल्ड मेडल देखील देण्यात आले आहे
निधी ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी असून याआधी तिने कॉलेजमध्ये उत्तम गुण संपादन करून आपले नाव लौकिक केले आहे.
ती भांडी व्यापारी पुंडलिक कणबरकर यांची मुलगी असून कावेरी कोल्ड्रिंक्स चे मालक नीलकंठ हंडे यांची नात आहे. तिच्या यशाबद्दल कुटुंबीय मित्रपरिवार आणि हितचिंतक तिच्यावर अभिनंदननाचा वर्षाव करत आहेत.