दक्षिण पश्चिम रेल्वेने कृष्ण जन्माष्टमी दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या काळात होणारी अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी यशवंतपूर-बेळगाव सुपरफास्ट एक्स्प्रेस स्पेशल ट्रेन क्रमांक ०७३७३/०७३७४ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेन क्र. ०७३७३ यशवंतपूर – बेळगाव सुपरफास्ट एक्सप्रेस विशेष यशवंतपूर येथून १८.०८.२०२२ (गुरुवार) रोजी रात्री ९.३० वाजता सुटेल आणि १९.०८.२०२२ (शुक्रवार) रोजी सकाळी ८:२५ वाजता बेळगावला पोहोचेल.
तर परतीच्या दिशेने, ट्रेन क्र. ०७३७४ बेळगाव– यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल बेळगाव येथून २१.०८.२०२२ (रविवार) रात्री ९.२० वाजता सुटेल आणि २२.०८.२०२२ (सोमवार) रोजी सकाळी ८:२० वाजता यशवंतपूरला पोहोचेल.
या ट्रेनमध्ये चार AC-3 टियर कोच, पाच द्वितीय श्रेणीचे स्लीपर कोच, सात सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन द्वितीय श्रेणी सामानासह ब्रेक व्हॅन/अपंग फ्रेंडली डब्बे (एकूण 18 डबे) असणार आहेत त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे .



