उद्या दिनांक बुधवार 10 ऑगस्ट रोजी शहरातील 22 शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बिबट्याचा वावर येथील गोल्फ कोर्स मैदान परिसरात असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे उद्या केंद्रीय विद्यालय क्रमांक दोन, वनिता विद्यालय, मराठी विद्यानिकेतन,एन पी इ टी क्लब रोड , के एल इ इंटरनॅशनल स्कूल,कुवेम्पू नगर, सरकारी प्राथमिक शाळा विश्वेश्वरय्या नगर सरकारी मराठी शाळा,सदाशिवनगर यासह हनुमान नगर सह्याद्री नगर कुवेम्पू नगर सदाशिवनगर कन्नड प्राथमिक सेंट झेवियर्स स्कूल दूरदर्शन नगर कन्नड प्राथमिक शाळा आणि हिंडलगा ग्रामपंचायतीतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच गोल्फ कोर्स मैदान परिसरातील हनुमान नगर जाधव नगर यासह आजूबाजूच्या परिसराला देखील बिबट्याच्या धोक्याबद्दल सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. फक्त शहरातील नाही तरच ग्रामीण भागातील नऊ शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे. वन खात्याने सध्या बिबट्याला पकडण्यासाठी शोधू मोहीम हाती घेतली आहे जर हा बिबट्या उद्यापर्यंत पिंजरा सापडला नाही तर मुलांच्या सुट्ट्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सदर सुट्टीचा आदेश शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी दिला आहे.



