15 ऑगस्ट राष्ट्रध्वजाचा मान राखा यानिमित्त हिंदु जनजागृती समितीने दर वर्षी प्रमाणे मोहीम राबविली होती.ज्यात
बेळगाव जिल्ह्यात डी. सी., पोलिस कमिशनर, शिक्षणाधिकारी असे शहर आणि ग्रामीण धरुन एकूण 90 शाळेत आणि 30 महाविद्यालयामध्ये राष्ट्रध्वजाचा मान राखण्याकरिता निवेदन देण्यात आले.
यावेळी एकूण शाळेमध्ये प्रबोधन उपस्थिती 1600,1 महाविद्यालयात प्रबोधन,
32 ठिकाणी फलक प्रसिद्धी करून ही मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेमध्ये हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्ट न झाल्याने या राष्ट्रध्वजांची विटंबना अनेक दिवस पहावी लागते. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला
राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (क्र.103 / 2011) दाखल केली होती. तिची सुनावणी करतांना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले. त्यानुसार केंद्रीय अन् राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले आहे.
तसेच आता शाळा महाविद्यालयांमध्ये देखील
हिंदू जनजागृती समितीने राष्ट्रध्वजाचा मान राखण्याकरिता निवेदन दिले आहे