साउथ कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आजादी का अमृत अमृत महोत्सवाचे आयोजन भव्य आणि दिव्य स्वरूपात करण्यात आले.
आजादी का अमृत महोत्सव यातील एक अभियान हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 हे तीन दिवस समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी राणी पार्वती देवी कला आणि वाणिज्य महाविद्यालय बीबीए विभागातर्फे शहरातील प्रमुख ठिकाणी समूह नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात 60 हुन अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता
या अभियानाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अनुजा नाईक व आयक्यूएसी समन्वयक डॉक्टर अभय पाटील यांनी तिरंगा फडकवून केले या अभियाना अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी नृत्यातून समाजामध्ये राष्ट्रध्वजाबद्दल प्रबोधन करण्यात आले व हर घर तिरंगा या अभियानाची माहिती देण्यात आली तसेच प्रत्येकाला भारतीय राष्ट्रध्वज वितरण करण्यात आले .जेणेकरून समाजातील नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम व राष्ट्रभावणे बद्दल जागृती निर्माण होईल.
15 ऑगस्ट 2022 या दिवशी राणी पार्वती देवी महाविद्यालयाच्या पु ल देशपांडे खुल्या रंगमंचावर एस के सोसायटीचे चेअरमन श्री किरण ठाकूर व व्हाईस चेअरमन प्रोफेसर एस वाय प्रभू व इतर सभासद यांच्या उपस्थितीत अभियानातील नृत्य प्रस्तुत करून या अभियानाची सांगता करण्यात आली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी तसेच कर्मचारी वर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.