येथील कित्तूर राणी चन्नमा चौकात काल रात्री भरधाव वेगात असणाऱ्या कंटेनर ची कित्तूर राणी चन्नम्मा चौकात असलेल्या पुतळ्याच्या भोवती संरक्षण कठड्याला जोराची धडक दिली.
यावेळी झालेल्या अपघातात कंटेनरच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच येथील कथडा देखील उद्ध्वस्त झाला आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी चालक किरकोळ जखमी झाला आहे.
सदर अपघात मंगळवारी रात्री उशिरा घडला.यावेळी या ठिकाणी असलेल्या पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी चन्नमा चौकात धाव घेतली.