बिबट्याच्या दर्शनाने पुन्हा एकदा गोल्फ मैदान परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून अदृश्य झालेला बिबट्या बुधवारी सकाळी प्रत्यक्ष दर्शनी च्या नजरेस पडला. त्यामुळे वनविभागाने आता या बिबट्याला पकडण्यात पुन्हा एकदा कंबर कसली आहे.
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून गोल्फ मैदान परिसरात ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला कधी जेल बंद करणार असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
सदर बिबट्याने एका गवंडी कामगारावर हल्ला केल्यानंतर त्याचे वास्तव्य जाधव नगर परिसरात होते. त्यानंतर तो गोल्फ कोर्स मैदानात लावलेल्या कॅमेरात चित्रबद्ध झाला.
तर त्यानंतर सदर बिबट्या कोणत्या ठिकाणी केला हेच समजेनासे झाले. त्यानंतर पुन्हा आज बिबट्या प्रत्यक्ष दर्शनींच्या नजरेस पडला त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.